मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना निरोप
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
मातोश्री शैक्षणिक संकुल कर्जुले अंतर्गत मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला..
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप लाभले. त्यांनी अनमोल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त बारावी मधील विद्यार्थ्यांनी कॉलेजसाठी साऊंड सिस्टिम त्याचप्रमाणे विविध महापुरुषांच्या 50 फोटो फ्रेम कॉलेजला सप्रेम भेट देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांनी बारावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने त्याचप्रमाणे बारावीनंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे व आपल्या आई वडिलांचे व कॉलेजचे नाव मोठे करावे असा सल्ला दिला.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या असतील तर त्या सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचे आश्वासन दिले तसेच संस्थेचे सचिव किरण आहेर यांनी कॉलेजच्या जीवनातील आठवणी सांगून मागील गोष्टींना उजाळा दिला तसेच आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये विविध कोर्सेस असून त्याची माहिती करून दिली व विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षाकरीता शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका शितल आहेर, वनकुटे गावचे सरपंच डॉ. नितीन रांधवन, प्राचार्य राहुल सासवडे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश नगरकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य गोरडे पी. एल, उपप्राचार्य डॉ. कृपाल पवार गणेश हांडे ,राजेंद्र साठे , सोनल पायमोडे, राहुल भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच मातोश्री सायन्स कॉलेजचे प्राचार्य राहुल सासवडे यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा