जय मल्हार विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जय मल्हार विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दत्ता ठुबे/पारनेर:--
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पारनेर तालुक्यातील पिपंळगावरोठा येथील जय मल्हार विद्यालयाने विशेष स्नेहसंमेलन व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विशेष स्नेहसंमेलनामध्ये अतिशय आकर्षक. मनमोहक. अप्रतिम,दर्जेदार असे नृत्यगीत विद्यार्थ्यांनी सादर केले.शेतकरी गीत, खंडोबा गीत, लावणी तसेच विविध गीत सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ सुरेखा वाळुंज,ऍड पांडुरंग गायकवाड मा. अध्याक्ष कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते झाले, संदीप घुले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गंगाराम घुले उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, गोपीनाथ घुले अध्यक्ष तंटामुक्ती पिंपळगाव रोठा, मा सरपंच नानाभाऊ भामरे,राजाराम मुंडे ,माजी विद्यार्थी, लक्ष्मण नाना सुंबरे,भास्कर पुंडे,खंडू सुपेकर,तानाजी मुळे,शरीफ भाई शेख,आसिफ पटेल,संदीप उमाप,माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी, ग्रामस्थ मुंबईकर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लाऊड स्पीकर व्यवस्था संतोष उंडे, फोटोग्राफर धनंजय अनंत, वेशभूषाकर श्रीकांत गायकवाड तसेच जरांगे सर यांनी नवीन शाळा इमारत उभी करण्यासंदर्भात पालकांना सुचित केले,याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी गोपीनाथ कुंडलिक घुले व गणेश शिवराम सुपेकर यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये देणगी जाहीर केली. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे अत्यंत थंडीच्या दिवसात माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला भगिनी कार्यक्रम शेवटपर्यंत पहात होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उंडे सर व श्री केदारी सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुंबरे सर यांनी केले. तसेच श्री जरांगे सर यांनी विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाची तयारी करून घेतली. शेवटी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा