सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप


सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने  समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन  माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले

*सटाणा तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण
नाशिक दि1
सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने  समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन  माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले

 सटाणा तालुक्यात मुंजवाड , टेंभे वरचे ठेंगोडा या ठीकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण  माजी समाज कल्याण मंत्री मा.बबनराव घोलप व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी बबनराव घोलप म्हणाले की समाजाने एकत्र येउन संघटन करून राहिले पाहिजेत.त्यापासुन समाजाची ताकद दिसते. ज्यापासुन राजकारण सुद्धा जवळ येते.शासनाच्या योजना वेळेवर मिळतात. या समाजाच्या प्रगतीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन थोर विभुतींचे आशिर्वाद आहेत.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नाशिक उपजिल्हा प्रमुख साहेबराव सोनवणे यांनी मुंजवाड येथे शाखेचे अनावरण करून घेतले तर वरचे टेंभे येथे सागर पाथरे यांनी फलकाचे अनावरण करून घेतले ठेंगोडा येथे अण्णा आहिरे यांनी फलकाचे अनावरण करून घेतले शेवटी देवळा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हा मेळावा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
   यावेळी कार्यक्रमाला श्री दत्तात्रेय गोतिसे राज्य सचिव, श्री दिलीप गोविंद जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आनंदा महाले ग्रामिण जिल्हाध्यक्ष भास्कर अहिरे जिल्हा युवा अध्यक्ष मनोज म्हैसधुणे नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाउसाहेब अहिरे शिरपुर नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश अहिरे महिला जिल्हा अध्यक्षा रेश्मा वाघचौरे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष भारती शिलावट, सुरेखाताई घोलप,अण्णा अहिरे माजी जिल्हा अध्यक्ष सिताराम जाधव, बागलाण ता. प्रमुख पोपट अहिरे देवळा संपर्क प्रमुख मधुकर अहिरे ता. अध्यक्ष शिवाजी आहिरे देवळ्याचे मा.नगरसेवक उल्हास गुजरे शहर प्रमुख मनोज गुजरे माजी ता. प्रमुख गोरख अहिरे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष सुमित शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल महाले,सुरेश अहिरे, केदा आहिरे रविंद्र आहीरे काशिनाथ आहिरे यांनी मेहनत केली. सुत्रसंचलन मेशीचे सरपंच शिवाजी अहिरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू

जय मल्हार विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न