पोस्ट्स

निघोज च्या मळगंगा यात्रेत बेकायदा वर्गणी वसुली पारनेर न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

इमेज
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी  : पारनेर तालुक्यातील निघोज येथील लाखो भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या  मळगंगा देवी यात्रेच्या नावाखाली बेकायदा वर्गणी वसुली केल्याच्या तक्रारीबाबत पारनेर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत .                             याबाबत अधिक माहिती अशी की निघोज येथील माता मळगंगा देवीची  राज्यातील प्रसिद्ध यात्रा भरत असते येथे जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्र आहे .  त्यामुळे राज्यभरातून या ठिकाणी भाविक व पर्यटक येत असतात . दरवर्षी येथे एप्रिल महिन्यात यात्रा भरते . यावेळी निघोज येथील बाळासाहेब गणाजी  लामखडे हे  मळगंगा यात्रा कमिटी या नावाने पावती पुस्तके छापून भाविक व  पर्यटकांकडून वर्गणी जमा करतात.  या वर्गणीचा हिशोब त्यांच्याकडे  मागितला असता तो देण्यास नकार दिल्याची तक्रार  येथील ग्रामस्थ  बबन कवाद यांनी केली होती.  सन २०१५ पासुन कवाद हे संबंधित देवस्थान ट्रस्ट व प्रशासानाकडे तक्रार करत होते परंतु त्यांच्...

मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना निरोप

इमेज
मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी मातोश्री शैक्षणिक संकुल कर्जुले अंतर्गत मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला..  सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप लाभले. त्यांनी अनमोल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त बारावी मधील विद्यार्थ्यांनी कॉलेजसाठी साऊंड सिस्टिम त्याचप्रमाणे विविध महापुरुषांच्या 50 फोटो फ्रेम कॉलेजला सप्रेम भेट देण्यात आल्या.  सदर कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांनी बारावी परीक्षेसाठी शुभेच्छा  दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने त्याचप्रमाणे बारावीनंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे व आपल्या आई वडिलांचे व कॉलेजचे नाव मोठे करावे असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या असतील तर त्या सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्...

पारनेर शहरात संत रोहिदास महाराज जयंती साजरी

इमेज
आ.लंके यांच्या उपस्थितीत,बबनदादा चौरे यांच्या प्रवचन सेवेतुन संत रोहिदासांच्या धार्मिक कार्याला दिला उजाळा ! दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी :          महाराष्ट्राची धार्मिक अस्मिता जतन करणाऱ्या पारनेर तालुक्यात जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य असणारे संत निळोबारायांसह अनेक साधुसंतांचा वारकऱ्यांचा तालुका म्हणून प्रचलित असणाऱ्या पारनेर तालुक्यात सर्वसाधारण संतांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडत असते . त्याच प्रमाणे पारनेर शहरामध्येही समस्त चर्मकार बांधवांतर्फे भव्य दिव्य संत रोहीदास महाराज जयंती उत्सव सोहळा पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती पारनेर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला .           संत रोहिदास महाराज जयंती सोहळ्यासाठी तालुक्यातून नव्हे तर जिल्हाभरातून चर्मकार समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली.या भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.   ...

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघांचा आज फैसला

इमेज
मुंबई - विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदार संघ  तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक  मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज गुरुवार (दि2) रोजी  निकाल जाहीर होणार आहे या मत दार संघात 30 फेब्रुवारी मत दान पार पडले आहे या मतदार संघात विजयाची माळ कोणाच्या गळयात माळ  पडते  या कडे आता लक्ष लागले आहे . नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.

*मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडे वाड्यासाठी छगन भुजबळ मैदानात*

इमेज
*मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या भिडे वाड्यासाठी छगन भुजबळ मैदानात* *आज उच्च न्यायालयात सुनावणीवेळी न्यायालयात भुजबळ स्वतः उपस्थित,राज्याचे महाधिवक्ता आणि विशेष सरकारी वकिलांशी चर्चा*  *भिडे वाड्यातील दुकानदार तडजोडीसाठी तयार, पुणे महानगरपालिकेने आता सहकार्य करणे गरजेचे - भुजबळ* *मुंबई- ०१ फेब्रूवारी* देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत.. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते यावेळी त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, तसेच विशेष सरकारी वकील यांच्याशी चर्चा केली आणि समन्वयाने यातून मार्ग काढावा अशी विनंती त्यांना केली….  यावेळी बोलताना ते म्हणाले की , भिडे वाड्यातील दुकानदार आणि मकानदारांना पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने हवी आहेत आणि त्यांना त्याच ठिकाणी दुकाने देवून वरती शाळा आणि स्मारक करणार...

सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप

इमेज
सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने  समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन  माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले *सटाणा तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण नाशिक दि1 सामाजिक संघटन वाढले पाहिजे त्याने  समाजाची ताकद वाढते त्यामुळे राजकारण सुद्धा जवळ येते असे प्रतिपादन  माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले  सटाणा तालुक्यात मुंजवाड , टेंभे वरचे ठेंगोडा या ठीकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नामफलकांचे अनावरण  माजी समाज कल्याण मंत्री मा.बबनराव घोलप व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी बबनराव घोलप म्हणाले की समाजाने एकत्र येउन संघटन करून राहिले पाहिजेत.त्यापासुन समाजाची ताकद दिसते. ज्यापासुन राजकारण सुद्धा जवळ येते.शासनाच्या योजना वेळेवर मिळतात. या समाजाच्या प्रगतीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन थोर विभुतींचे आशिर्वाद आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नाशिक उपजिल्हा प्रमुख साहेबराव सोनवणे यांनी मुंजवाड येथे शा...

आमदार लंके यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांची होणार मोफत आरोग्य तपासणी

इमेज
 पाच हजार रूपयांच्या चाचण्या मोफत होणार!   दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी        पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दि. २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या शिबिरात खाजगी लॅबमध्ये ५ हजार रूपये खर्च येणाऱ्या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.      या शिबिरात ऑडियन स्क्रीनिंग टेस्ट शुध्द टोन ऑडिओग्राम, दृष्टी स्क्रीनिंग चाचणी,सी. बी.सी चाचणी, रक्तातील साखरेची चाचणी, यकृत कार्य चाचण्या, मुत्रपिंड कार्य चाचण्या, लिंपिड प्रोफाईल, मलेरिया परजिवी, ईएसआर, टी थ्री टी फोर टीएसएच, सिरम लोह, जीजीटीपी, मॅग्नेशियम या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.        गुरूवार दि.२ फेब्रुवारी ते रविवार दि.५ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते ५ दरम्यान पार पडणारे हे शिबीर कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारील मैदानावरील राज्यस्तरीय कृषी गंगा प्रदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी रूग्ण...