निघोज च्या मळगंगा यात्रेत बेकायदा वर्गणी वसुली पारनेर न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोज येथील लाखो भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या मळगंगा देवी यात्रेच्या नावाखाली बेकायदा वर्गणी वसुली केल्याच्या तक्रारीबाबत पारनेर न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत . याबाबत अधिक माहिती अशी की निघोज येथील माता मळगंगा देवीची राज्यातील प्रसिद्ध यात्रा भरत असते येथे जगप्रसिद्ध कुंड पर्यटन क्षेत्र आहे . त्यामुळे राज्यभरातून या ठिकाणी भाविक व पर्यटक येत असतात . दरवर्षी येथे एप्रिल महिन्यात यात्रा भरते . यावेळी निघोज येथील बाळासाहेब गणाजी लामखडे हे मळगंगा यात्रा कमिटी या नावाने पावती पुस्तके छापून भाविक व पर्यटकांकडून वर्गणी जमा करतात. या वर्गणीचा हिशोब त्यांच्याकडे मागितला असता तो देण्यास नकार दिल्याची तक्रार येथील ग्रामस्थ बबन कवाद यांनी केली होती. सन २०१५ पासुन कवाद हे संबंधित देवस्थान ट्रस्ट व प्रशासानाकडे तक्रार करत होते परंतु त्यांच्...