शिधापत्रिका धारकांना ३१ डिसेंबरपर्यंत आधारकार्ड स्वस्तधान्य दुकानदाराकडे जमा करा

शिधापत्रिका लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत आधारकार्ड स्वस्तधान्य दुकानदाराकडे जमा करावेत

अकोले तहसीलदार यांचे आवाहन

अकोले प्रतिनिधी –प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड ३१ डिसेंबर पर्यंत स्वस्तधान्य दुकानदारांकडे जमा करावेत. अन्यथा अशा शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येईल. असे आवाहन अकोले तहसीलदार सतीश थेटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

अकोले तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणाली मध्ये जोडण्यात आलेले नाही. अशा कुटूंबाच्या याद्या स्वस्तधान्य दुकानादारांकडे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. कुटूंब प्रमुख म्हणून घोषीत झालेल्या सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन प्रमाणालीमध्ये समाविष्ट झालेले नाही. अशा कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नांव असलेल्या स्वस्तधान्य दुकानदाराकडे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जमा करावेत. 

मुदतीत आधारकार्ड जमा न केल्यास अशा कुटूंब प्रमुख सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन लिंक होणार नाही. त्यामुळे अशा शिधापत्रिका धारकाचे अन्न सुरक्षा योजनेतून नाव वगळण्यात येऊन लाभ बंद करण्यात येईल. असे आवाहनही श्री.थेटे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू