महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा ऊर्जामंत्री फडणवीस यांच्यासोबत यशस्वी चर्चा


*मुंबई*-राज्यातील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात ३ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र, या संपाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे महावितरणने संप मागे घेतला आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.
महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी चर्चा केली आणि ही चर्चा साकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाहीये, याउलट सरकार ३ कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, असंही फडणवीसांनी सांगितले. त्यासोबतच सरकार वयोमर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांची भरती करणार. महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सवलती वाढवणार, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू