नेप्तीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षक व बालिकांच्या सन्मानाने साजरी



महिलांना कर्तृत्व सिध्द करण्याचा अधिकार सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाला -प्रा. एकनाथ होले
अहमदनगर /प्रतिनिधी- 
नेप्ती (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, साई सजीवनी प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील महिला शिक्षिका व शालेय बालिकांचा गौरव करण्यात आला. 
नेप्तीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व श्री संत सावता महाराज मंदिरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सरपंच विठ्ठल जपकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य किसन (देवा) होले, उपसरपंच संजय जपकर, कॅप्टन सदाशिव भोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, साई संजीवनी प्रतिष्ठानचे प्रा. एकनाथ होले, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, समता परिषदेचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, माजी सरपंच सुधाकर कदम दिलीपराव होळकर, माजी उपसरपंच शिवाजीराव होळकर, जालिंदर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य फारुक सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख, बंडू जपकर, बाबासाहेब होळकर, एकनाथ जपकर, नानासाहेब बेल्हेकर, भानुदास फुले,    सौरभ भुजबळ, सागर शिंदे, नितीन शिंदे, सार्थक होले, मिलिंद होले, संकेत कर्पे, दादू दरेकर, सुभाष होले, गणेश होले,  रमेश रावळे, कैलास बेल्हेकर ,वसंत कदम, सुरेश कदम, अमोल चौगुले, सत्तार सय्यद, राहुल गवारे, बबन सय्यद, कुमार जपकर, भीमराज जपकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गावात ज्ञानदानाचे कार्य करणार्या शिक्षिका मीना काठमोरे, नूतन पाटोळे, राधिका वामन, अश्‍विनी चौगुले, महिला पालक सोनाली कदम, अंगणवाडी सेविका मिरा जपकर, रखमा जपकर, राजश्री कोल्हे, मिरा इंगोले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कार्ले, योगेश पवार, सावता बनकर यांचा साई संजीवनी प्रतिष्ठानचे संचालक प्रा. एकनाथ होले व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी युवा कीर्तनकार शिवव्याख्याते आकाश महाराज फुले यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. 
 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सुनीता विल्यम, सिंधुताई सपकाळ या कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा परिधान करुन मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश दिला. यावेळी साई संजीवनी प्रतिष्ठानचे संचालक
 प्रा. एकनाथ होले म्हणाले की, स्त्रियांना जगण्याचा व आपले कर्तृत्व सिध्द करण्याचा अधिकार सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाला. मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी खुले केले. यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. महिला सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले. 
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी...................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू