माका येथे आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
माका प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माका विद्यालयामध्ये आज मंगळवार दिनांक 3/1/2023रोजी शैक्षणिक वर्ष 2022- 23 या वर्षाच्या आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळा समितीचे सदस्य मा. श्री. रमेश दादा कराळे,मा. श्री. सुदाम भाऊ घुले तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री.विनोद जी पटेकर यांच्या शुभहस्ते पार पडले,
याप्रसंगी क्रीडा शिक्षक श्री. भोगे सर यांनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले, त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा 3/1/2023ते 7/1/2023 पर्यंत चालू राहतील असे मुख्याध्यापक यांनी सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा