बिबट्याचे दर्शनाने वासुंदे परिसरात भीतीचे वातावरण, पिंजरा लावण्याची मनोज झावरे यांची मागणी


दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी : 
वासुंदे व परिसरात गेल्या सहा महिन्यापासून सलग बिबट्याचे दर्शन होत आहे. गावातील शिक्री, बोकनकवाडी तसेच बर्वेनगर परिसर, कुंभर बेंद, शिर्के मळा, नानकर मळा, राऊत मळा, खडक वस्ती या भागामध्ये बिबट्या दिसला आहे. वासुंदा ग्रामपंचायत ने यासंदर्भात तीन महिन्यापूर्वीच वन विभागाशी संपर्क साधून परिसरामध्ये पिंजरा लावण्यासाठी विनंती केली होती. परंतु बिबट्याचे वारंवार दर्शन होत असतानाही पिंजरा लावण्यात आलेला नाही. वारंवार बिबट्या दिसल्याच्या संदर्भातील व्हिडिओ, फोटोज व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. बिबट्याची वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री जात असतात परंतु सध्या बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन वासुंदे परिसरामध्ये दोन पिंजरे लावावेत ही विनंती. अशी मागणी अँटी करप्शनचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोज झावरे यांनी वन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू