.पद्मशाली सखी संघमच्या समन्वयिकापदी पेगडा आणि नंदाल यांची निवड
.
पद्मशाली सखी संघमच्या समन्वयिकापदी
पेगडा आणि नंदाल यांची निवड
सोलापूर : सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या समन्वयिका म्हणून सौ. अंबिका पेगडा आणि
सौ. मीना नंदाल यांची निवड करण्यात आले आहे.
पद्मशाली सखी संघम तर्फे सामाजिक आणि विधायक उपक्रमांवर भर देण्यात येत आहे. अल्पावधीतच नावारुपास आलेल्या या संस्थेच्या वतीने भविष्यात महिलांसाठी उद्योग व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरु करण्याचा मानस आहे असे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी कळवले आहे. तसेच वनिता सुरम, गीता पडाल, आरती बुधारम, सुनिता निलम (क्यामा), अरुणा आडम यांची सदस्या म्हणून निवड केले आहे. या सर्वांची निवड गौरीशंकर कोंडा यांनी केले आहे.
यावेळी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे, सचिवा ममता मुदगुंडी, सहसचिवा जमुना इंदापूरे, सहखजिनदार ममता तलकोकूल यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा