लाखो शिधापत्रिकाधारकांना आता येणार SMS

पावसाळी अधिवेशनातील महत्वाची मागणी मान्य : लाखो शिधापत्रिकाधारकांना लाभ !

राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते. मात्र रेशन किती द्यायला हवे ? आपल्याला किती मिळाले ? याबाबत पारदर्शकता नसल्याचे सातत्याने समोर येत असत. अनेक जागरूक नागरिकांनी सदर समस्या निदर्शनास आणून दिली. 

पावसाळी अधिवेशनात रेशनबाबत शिधापत्रिकाधारकांना थेट मोबाईलवर एसएमएस मिळून पारदर्शकता यावी अशी मागणी केली होती. सदर मागणी पूर्ण होऊन नागरिकांना आता थेट मोबाईलवर एसएमएस प्राप्त होणार आहे. 

सदर एसएमएस सुविधेमुळे आपल्या हक्काचे धान्य दुसऱ्या कोणाला देता येणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा घोळ थांबेल व शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू