आ. निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंब्या साठी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन
नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या कामासाठी आ. निलेश लंके यांनी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेले उपोषण अजून सुरूच असून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आमदार निलेश लंके सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करत असलेले उपोषणाची दखल घेतली जावी म्हणून आता ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात
टाकळी ढोकेश्वर व सुपा येथे रस्ता रोको आंदोलन होत असल्यामुळे आमदार निलेश लंके यांनी नगर येथे सुरू केलेल्या आंदोलन आता आणखीन तीव्र बनत आहे.
टाकळी ढोकेश्वर चौकात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे नेते बा. ठ. झावरे, राजेंद्र चौधरी, सरपंच प्रकाश गाजरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र गायखे, संदीप ठाणगे, टाकळी ढोकेश्वर सरपंच अरुणाताई खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे, दत्तात्रय निवडुंगे, अंकुश पायमोडे, बाळासाहेब शिंदे, योगेश पवार, अशोक आहेर, नितीन चिकणे, पळसपुर सरपंच सुवर्णा आहेर, पांडुरंग आहेर, अजित भाईक, भागुजी झावरे, गोरख आहेर, अनिल तांबडे, अमोल उगले, रामदास दाते, स्वप्निल झावरे, बबन गांगड, रवींद्र राजदेव, चंद्रभान ठुबे, शशिकांत आंधळे, युवराज मुळे, तुकाराम केदार, रावसाहेब बर्वे, निलेश भालके, सुदाम शिर्के, इंद्रभान झावरे, पंडित पवार, राहुल मधे, गणेश वाकडे, माणिक फरतारे, अमोल आल्हाट, गंगाराम उंडे, सुभाष ठुबे, विष्णू आंधळे, वसंत आंधळे, मंगेश आंधळे, विष्णू दाते, अशोक आंधळे, अनिल चव्हाण, मळीभाऊ रांधवण, जयसिंग खिलारी, जयसिंग झावरे, सोमनाथ बांडे,
कारेगाव सरपंच बापूराव ठुबे, बाळासाहेब घुले, सुभाष खरात, संपत ठुबे, पिरताजी घुले, सुरेश घुले, रफिक शेख, बाळू घुले, युवराज खिलारी, आदेश झावरे, विक्रम झावरे, सचिन आल्हाट, बबलू झावरे, बबन बांडे, बबन बांडे, विठ्ठल पायमोडे, रावसाहेब सोनवणे, अहमद हवालदार, तुषार गोरडे, आदी यावेळी उपस्थित होते. तसेच टाकळी ढोकेश्वर पोखरी, पळसपुर, काटाळवेढे, पोखरी, म्हसोबा झाप, कामटवाडी, वारणवाडी देसवडे, मांडवे खुर्द, खडकवाडी, पळशी, वनकुटे, वासुंदे, काकणेवाडी, पिंपळगाव रोठा, कर्जुले हर्या, सावरगाव, नांदूर पठार, या गावांमधून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्यथा पारनेर तालुका बंद ठेवू...,
आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती संदर्भात आक्रमक होत गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आमदार निलेश लंके यांच्या आंदोलन आक्रमक होत असून उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डी, शेवगाव, राहुरी, नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर दक्षिण या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनावर जर आज तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही तर पारनेर तालुका बंद ठेवून असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको करत दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा