कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू

अकोले | प्रतिनिधी

प्रवरा नदी पाञात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील म्हाळादेवी येथे घडली. पुनम किरण भोसले (वय 27) रा. कोल्हार खुर्द व आर्या किरण भोसले (वय 3 वर्षे )असे मृत्युमुखी पडलेल्या माय लेकींची नावे आहेत.

कोल्हार खुर्द सासरी असलेल्या पुनम किरण भोसले व आर्या या मायलेकी म्हाळादेवी या गावी माहेरी आपले वडील नारायण महादू संगारे यांचेकडे आल्या होत्या. गुरुवारी दुपारी पुनम व त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमी लगत असलेल्या म्हाळादेवी येथील धोबी घाटावर गेल्या होत्या. वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी नसल्याने त्यांनी शोधाशोध केली.


धोबी घाटावर या मायलेकींच्या चपला व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले. गावकऱ्यांनी शोधले असता पाण्यातून पुनम यांचा मृतदेह गुरुवारी रात्री बाहेर काढण्यात आला. आर्याचा पोलिस व नागरिकांनी पाण्यात रात्रभर शोध घेतला. अखेर सकाळी प्रवरा नदीच्या पात्रात आर्यांचा मृतदेह तब्बल 14 तासाने आढळून आला. म्हाळादेवी गावचे पोलीस पाटील अशोक कचरू संगारे यांचे खबर दिल्यावरुन अकोले पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

अन्यथा आदिवासी विकास मंत्र्यांच्या शहरात राज्यव्यापी मोर्चा

सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप