राष्ट्रीय महामार्गाचे चे अभियंत्यांची आंदोलकांनी पाथर्डीत खुर्ची जाळली !

*पाथर्डी:(प्रतिनिधी)* राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील नाईक चौक येथे भाजप वगळता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कार्यकर्त्यांनी पाथर्डी मध्ये जाळपोळ केली. राष्ट्रीय महामार्गाचा कार्यालयातील खुर्च्या कार्यकर्त्यांनी ऑफिसच्या बाहेर आणून त्या पेटवून दिल्या. इतकेच नाही तर शहरातील विविध रस्त्यांवर टायर पेटवून रस्ता बंद करण्याचा देखील प्रयत्न केला.दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने आज मात्र हिंसक वळण घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

अन्यथा आदिवासी विकास मंत्र्यांच्या शहरात राज्यव्यापी मोर्चा

सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप