मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महा मंडळाच्या या आहेत योजना
अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुद्धीष्ट व जैन समाजातील घटकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्य शासन पुरस्कृत योजना राबविली जाते. थेट कर्ज योजना ही मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलातून राबविण्यात येते.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ
विद्यार्थी, महिलांनाही मिळतोय आधार
बेरोजगारांना व्यवसायास २० लाखांपर्यंत कर्ज
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे विद्यार्थी, महिला, बेरोजगारांना अत्यंत कमी व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. यासाठी विविध योजना महामंडळामार्फत राबविल्या जात आहेत.
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू धर्मातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास तथा वित्त निगम यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. निगममार्फत कर्ज स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ. ए. २ पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना यांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येते. या योजनांमध्ये लाभार्थ्याच्या आर्थिक उत्पन्न मर्यादच्या आधारे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे विद्यार्थी, महिला, बेरोजगारांना कर्ज महामंडळाच्यावतीने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ज्यू धर्मातील विद्यार्थी, बेरोजगार, महिला बचत गटांना कर्ज पुरवठा केला जातो. शिक्षणासाठी ३ टक्के तर व्यवसायासाठी ८ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. महिला बचत गटांसाठी २० लाखांपर्यंत कर्ज, महिला बचत गटांसाठी क्रेडिट लाइन ९ मधील गटात प्रत्येक सदस्यास १ लाख रुपये व २० सभासदांच्या गटास २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.
अर्ज कोठे कराल ? कर्ज १ विद्यार्थी, बेरोजगार, महिला बचत गटांना कर्जाचा पुरवठा महामंडळामार्फत केला जातो. शिक्षणासाठी ऑनलाइन तर व्यवसायासाठी ऑफलाइन अर्ज करता येतात. २०२१-२२ या आर्थिक वर्षात २६ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतला आहे. त्यांना ६५ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. शैक्षणिक कर्ज योजना शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये शिक्षणासाठी ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना कर्जाची परतफेड करायची आहे. व्यवसायासाठी बेरोजगारांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळातर्फे कर्ज पुरवठा केला जातो. व्यावसायिक कर्जासाठी २० लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. बेरोजगार तरुणांनी अर्ज करावेत महामंडळामार्फत अनेक योजना सुरु आहेत, बचत गट व अल्पसंख्याक विद्याथ्यांना मदत केली आहे. बेरोजगार तरुणांनीही कर्जासाठी अर्ज करावेत. वर्षभरात २६ जणांनी घेतला लाभ महिला बचत गट अल्पसंख्याक धर्मातील महिलांना कर्जाचा लाभ घेता येतो.
. तरुणांना वर्षभर कार्यालयात अर्ज करता येऊ शकतात.
नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती.रहिवासी दाखलाओळखपत्र : अर्जदार व दोन्हीचे (आधारकार्ड / इलेक्शन कार्ड/पारपत्रक)उत्पन्नाचा दाखला; शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 किंवा 20 रुपयाच्या बॉंड पेपरवर स्वतः प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.अर्जदार / जामिनदाराचे हमीपत्र बेबाकी प्रमाणपत्र.जामिनदार : अर्जदारास ओळखणाऱ्या व्यक्तीकडून कर्जासाठी हमी देत असल्याचे, विहित नमुन्यातील रु.100/-च्या स्टॅंप पेपरवरील हमीपत्र.विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू झाल्याबाबतचा ग्रामसेवक / नगरपालिका यांनी प्रमाणित केलेला दाखला.घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट झाल्याबाबतचा न्यायालयाचा दाखला किंवा रु.20/-च्या बॉंड पेपरवर अर्जदाराचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.दंगलपिडीत व्यक्तीबाबत पोलीस पंचनाम्याची प्रत.नैसर्गिक आपदग्रस्त व्यक्तींबाबत तलाठी / तहसिलदार / जिल्हाधिकारी यांचा अहवाल.दिव्यांगांना शासकीय रुग्णालयातील / जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित केलेला दाखला.दारिद्रय रेषेखालील उमेदवारांना दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
हे कागदपत्रे आवश्यक
- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
- रहिवासी दाखला
- ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे (आधारकार्ड / इलेक्शन कार्ड/पारपत्रक)
- उत्पन्नाचा दाखला; शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 किंवा 20 रुपयाच्या बॉंड पेपरवर स्वतः प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- अर्जदार / जामिनदाराचे हमीपत्र बेबाकी प्रमाणपत्र.
- जामिनदार : अर्जदारास ओळखणाऱ्या व्यक्तीकडून कर्जासाठी हमी देत असल्याचे, विहित नमुन्यातील रु.100/-च्या स्टॅंप पेपरवरील हमीपत्र.
- विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू झाल्याबाबतचा ग्रामसेवक / नगरपालिका यांनी प्रमाणित केलेला दाखला.
- घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट झाल्याबाबतचा न्यायालयाचा दाखला किंवा रु.20/-च्या बॉंड पेपरवर अर्जदाराचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
- दंगलपिडीत व्यक्तीबाबत पोलीस पंचनाम्याची प्रत.
- नैसर्गिक आपदग्रस्त व्यक्तींबाबत तलाठी / तहसिलदार / जिल्हाधिकारी यांचा अहवाल.
- दिव्यांगांना शासकीय रुग्णालयातील / जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित केलेला दाखला.
- दारिद्रय रेषेखालील उमेदवारांना दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
लाभाचे स्वरूप
- कर्ज मर्यादा 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत स्वगुंतवणूक 5 टक्के, कर्ज 95 टक्के व्याजदर (द.सा.द.शे.) 6 % परतफेड - 5 वर्षाच्या कालावधीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा