अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक पंचवार्षिक निवडणूक हालचाली सुरू!

अहमदनगर प्रतिनिधी
– अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली सुरू झाले आहे बँकेच्या निवडणुकीसाठी सभासदांची प्रारूप मतदार यादी  प्रसिद्ध करण्यात आली आहे
 या प्रारूप यादीत 17503 सभासद मतदारांचा समावेश असून यादीवर 26 डिसेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ग्रामपंचायत निवडणुकांमुळे 20 डिसेंबरपर्यंत आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने 13 डिसेंबर रोजी आदेश जारी करत ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात त्या टप्प्यापासून पुढे 16 डिसेंबरपासून पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशित केले होते.

 जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला
 आहे.
 सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या (सुधारणा) 2013 चे कलम 73 कब व त्याखालील निवडणूक नियम 2014 चे नियम 6 ते 10 मधील तरतुदीनुसार 1/4/2022 च्या अर्हता दिनांकापासून तयार केलेल्या बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 21 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात 17503 पात्र सभासद मतदारांचा समावेश आहे. या प्रारूप यादीवर 26 डिसेंबरपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 
प्राप्त हरकतीवर 5 जानेवारी रोजी सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे. तर 10 जानेवारी रोजी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू