शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ची सरशी

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची सरशी तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल जाहीर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

        नुकत्याच झालेल्या शेवगाव तालुक्यातील बारा ग्रामपंचायत मतदानाची आज शेवगाव तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. 
शासनाच्या नवीन धोरणानुसार सरपंचपद जनतेतून असल्याने सरपंच पदाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीकडे आठ, भारतीय जनता पार्टीकडे तीन तर जनशक्ती विकास आघाडी कडे एक सरपंचपदावर विजय मिळवला आहे. 
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 
प्रभुवाडगाव, खामगाव, राउतळे, कुरुडगाव, चौरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी, दहिगावने या आठ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
 तर वाघोली सुलतानपूर अमरापूर येथील सरपंच पदावर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर आखेगाव ग्रामपंचायतवर जनशक्ती विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव(प्रभूवाडगाव)विद्या अरुण बडदे (खामगाव) चंद्रकला नवनाथ कवडे (रावतळे कुरुडगाव) स्नेहल रोहन लांडे (जोहरापूर) शितल मंगेश थोरात (खानापूर) मनीषा राजेंद्र आढाव (भायगाव) काकासाहेब मुरलीधर घुले (रांजणी) सुनिता देवदान कांबळे (दहिगाव ने)तर भाजपचे उमेदवार विजयी  सुश्मिता विजय भालसिंग (वाघोली) सविता विजय फलके (सुलतानपूर) आशा बाबासाहेब गरड (अमरापूर) असे आहेत तर जनशक्ती विकास आघाडीचे विजयी उमेदवार आयोध्या शंकर काटे (आखेगाव) विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होतात समर्थकांकडून फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली. व विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.



   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू