पारनेर तालुक्यात विजयी मिरवणुकांवर बंदी घालता मग अवैध धंद्यांबाबतीत उदासिनता का ?- अविनाश पवार


-पारनेर  पोलिस प्रशासनाने पारनेरच्या  शांततेच्या दृष्टीने सिंघम स्टाईल  घेतलेल्या खमक्या   निर्णयाचे नक्कीच १००% स्वागत पण असाच निर्णय पारनेर तालुक्यातील महिला भगिनी सुरक्षिततेच्या दृष्टीने , अवैद्य धंदे,हप्ते खोरी  व राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांना  सरळ करण्यासाठी सिंघम स्टाईल घेतला तर नक्कीच अभिमानाने  जाहीर स्वागत करू-

 मनसे नेते अविनाश पवार)
पारनेर:-पारनेर तालुक्यात पोलिस प्रशासनासह महसूल प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पुर्णपणे शांततेत होईल व कुठे  ही गालबोट लागणार नाही याची जशी दक्षता घेतली हे कामं नक्कीच आदर्शवत आहे तसेच  ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर  राजकीय  शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गाजा वाजा करत  विजयी मिरवणुका न काढता  शांततेच्या मार्गाने रहान्यासंदर्भात  पोलिस प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे १००%स्वागत आहे पण हाच निर्णय पारनेर तालुक्यातील आम जनतेसाठी महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व अवैध धंदे बंद करण्यासाठी सुद्धा घ्यायला हवा.पारनेर तालुक्यातील जनता नक्कीच प्रशासनाचे जाहीर  स्वागत करेल. आज पारनेर तालुक्यात चालु असलेल्या हप्ते खोरी,गुंडगिरी मुळे पारनेर तालुक्यातील सुपा एम आय डिसी मधील कंपन्या, उद्योग स्थलांतरित झाले आहेत हे सुद्धा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू