दिंडोरी तालुक्यातील वणी येथे बुधवारी रोजगार मेळावा 12 कंपन्या सहभागी होणार
नाशिक प्रतिनिधी
राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य व विकास
विभागाच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील वणी
येथे दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
आयोजन बुधवारी (दि.२८) करण्यात आले
आहे.
त्यामध्ये तालुक्यातील तब्बल १२ विविध
कंपन्या आणि नियुक्ते सहभागी होणार असून
नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांच्या सकाळी
९.३० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान तेथेच
मुलाखती होऊन निवड केली जाणार
असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या
सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली.
मेळाव्यात दहावी, बारावी, तसेच कोणत्याही
शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय,
अभियांत्रिकी पदवी, आयटीआय, इ. विविध
शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या
उपलब्ध आहेत. संधी स्वयंरोजगारासाठी
तसेच,आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध
महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असून कर्ज
योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात
येणार आहे. हा मेळावा वणी येथील मराठा
विद्याप्रसारक समाज संचालित कर्मवीर
रावसाहेब थोरात आर्ट, सायन्स आणि
कॉमर्स महाविद्यालय, वणी, ता. दिंडोरी,
यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
उमेदवारांनी अद्यापपर्यंत नसल्यास
इच्छुकानी सेवायोजना नोंदणी केली नसल्यास
या www.mahaswayam.gov.in सेवायोजना नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा
संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन
करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध
रिक्तपदांसाठी अर्ज करावा,
संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन
करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध
रिक्तपदांसाठी अर्ज करावा,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा